YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 2:5-11

२ करिंथ 2:5-11 MARVBSI

कोणी दु:ख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही, तर काही अंशी — फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर — तुम्हा सर्वांना दिले. अशा मनुष्याला बहुमताने दिली ती शिक्षा पुरे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे. नाहीतर तो दु:खसागरात बुडून जायचा. म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खातरी करून द्या. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता तो असा की, तुम्ही सर्व बाबतींत आज्ञापालन करता की नाही ह्याचे मला प्रमाण पटावे. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरता ख्रिस्तासमक्ष केली आहे; अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये; त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.