YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 11:23-28

२ करिंथ 11:23-28 MARVBSI

ते अब्राहामाचे संतान आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (हे मी वेडगळासारखे बोलतो); श्रम करण्यात, कैद सोसण्यात, बेसुमार फटके खाल्ल्यामुळे व पुष्कळ वेळा मृत्यूच्या दाढेत पडल्यामुळे मी अधिक आहे. पाच वेळा मी यहूद्यांच्या हातून एकोणचाळीस फटके खाल्ले. तीन वेळा छड्यांचा मार खाल्ला. एकदा मला दगडमार झाला; तीन वेळा माझे गलबत फुटले व एक दिवस व एक रात्र मी समुद्रात घालवली; मी कितीतरी प्रवास केला; नद्यांवरील संकटे, लुटारूंमुळे आलेली संकटे, माझ्या देशबांधवांनी आणलेली संकटे, परराष्ट्रीयांनी आणलेली संकटे, नगरातली संकटे, रानातली संकटे, समुद्रावरची संकटे, खोट्या बंधूंनी आणलेली संकटे; श्रम व कष्ट, कितीतरी वेळा केलेली जागरणे, तहानभूक, पुष्कळ उपासतापास, थंडी व उघडेवागडेपणा, ह्या सर्वांमुळे मी अधिक आहे. शिवाय ह्या व अशा इतर गोष्टींखेरीज माझ्या मनावरचे ओझे, म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता ही आहे.