YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ करिंथ 10:2-5

२ करिंथ 10:2-5 MARVBSI

माझे मागणे असे आहे : आम्ही देहस्वभावाने चालणारे आहोत असे कित्येक लोक मानतात; असे लोक माझ्यासमोर आल्यावर त्यांच्याशी कडकपणे बोलावेसे मला वाटण्याचा संभव आहे. तेव्हा कडकपणाने बोलण्याचा माझ्यावर प्रसंग आणू नये. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकवण्यास लावतो