परमेश्वर शलमोनाला रात्री दर्शन देऊन म्हणाला, “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि हे गृह यज्ञगृह व्हावे म्हणून मी आपल्यासाठी निवडले आहे. पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून मी जर आकाशकपाटे बंद केली, किंवा जमिनीचा उपज फस्त करण्यासाठी टोळधाड पाठवली, किंवा आपल्या लोकांमध्ये मरी पाठवली, तर माझे नाम ज्यांना दिले आहे त्या माझ्या लोकांनी दीन होऊन माझी प्रार्थना केली आणि माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होऊन ते आपल्या दुष्ट मार्गांपासून परावृत्त झाले तर मी स्वर्गातून त्यांची विनंती ऐकून त्यांच्या पापांची त्यांना क्षमा करीन व त्यांच्या देशातून क्लेश नाहीसे करीन. जी प्रार्थना ह्या स्थानी करण्यात येईल तिच्याकडे माझे डोळे उघडे राहतील व माझे कान लागतील. ह्या मंदिरी माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी हे निवडून पवित्र केले आहे; माझे नेत्र व माझे मन हे येथे सतत लागलेले राहील. जर तू आपला बाप दावीद ह्याच्याप्रमाणे खर्या मनाने माझ्यासमोर वागलास, माझ्या सर्व आज्ञांप्रमाणे वागलास, माझे विधी व नियम पाळलेस, तर ‘इस्राएलाच्या गादीवर आरूढ होणार्या तुझ्या कुळातल्या पुरुषांची परंपरा खुंटायची नाही,’ असा जो करार मी तुझा बाप दावीद ह्याच्याशी केला त्याप्रमाणे मी तुझे राजपद स्थापीन. पण जर तुम्ही बहकून जे नियम व आज्ञा मी तुम्हांला विहित केल्या आहेत त्या न पाळाल आणि जाऊन अन्य देवांची उपासना व त्यांचे भजनपूजन कराल, तर जो देश मी इस्राएल लोकांना दिला आहे त्यातून त्यांचे निर्मूलन करीन आणि हे जे मंदिर मी आपल्या नामाप्रीत्यर्थ पवित्र केले आहे ते माझ्या नजरेआड करीन आणि ते इतर सर्व राष्ट्रांत दृष्टान्ताचा व निंदेचा विषय करीन
२ इतिहास 7 वाचा
ऐका २ इतिहास 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 7:12-20
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ