मग देशातल्या लोकांनी योशीयाचा पुत्र यहोआहाज ह्याला त्याच्या जागी यरुशलेमेत राजा केले. यहोआहाज राज्य करू लागला तेव्हा तो तेवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत तीन महिने राज्य केले. मिसराच्या राजाने यरुशलेमेत येऊन त्याला पदच्युत केले व देशावर त्याने शंभर किक्कार रुपे व एक किक्कार सोने एवढी खंडणी बसवली. मिसरच्या राजाने त्याचा भाऊ एल्याकीम ह्याला यहूदा व यरुशलेम ह्यांवर राजा केले व त्याचे नाव बदलून यहोयाकीम असे ठेवले. त्याचा भाऊ यहोआहाज ह्याला नखो मिसर देशास घेऊन गेला.
२ इतिहास 36 वाचा
ऐका २ इतिहास 36
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 36:1-4
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ