योशीया राज्य करू लागला तेव्हा तो आठ वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत एकतीस वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे बरे ते त्याने केले; ज्या मार्गांनी त्याचा पूर्वज दावीद चालला त्यांनीच तोही चालला; उजवीडावीकडे वळला नाही. आपल्या कारकिर्दीच्या आठव्या वर्षी तो अल्पवयी असतानाच आपला पूर्वज दावीद ह्याच्या देवाच्या भजनी लागला; बाराव्या वर्षी तो उच्च स्थाने, अशेरा मूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती यहूदा व यरुशलेम ह्यांतून काढून टाकू लागला. लोकांनी त्याच्यासमक्ष बआल मूर्तींच्या वेद्या मोडून टाकल्या; त्यांच्या वरच्या भागी असलेल्या सूर्यमूर्ती त्याने फोडूनतोडून टाकल्या; अशेरामूर्ती आणि कोरीव व ओतीव मूर्ती त्याने फोडून त्यांचे चूर्ण केले व ते चूर्ण जे त्यांना यज्ञ करीत असत त्यांच्या कबरांवर पसरले. पुजार्यांच्या अस्थी त्याने त्यांच्याच वेद्यांवर जाळून टाकल्या; ह्याप्रमाणे त्याने यहूदा व यरुशलेम ही शुद्ध केली. त्याने मनश्शे, एफ्राईम, शिमोन व नफताली येथपर्यंतच्या शहरांत व त्यांच्या सभोवतालच्या ओस पडलेल्या जागी तसेच केले. त्याने वेद्या मोडून टाकल्या, अशेरामूर्ती व कोरीव मूर्ती कुटून त्यांचे चूर्ण केले आणि इस्राएल देशातल्या सर्व सूर्यमूर्ती त्याने तोडूनफोडून टाकल्या आणि मग तो यरुशलेमेस परत आला.
२ इतिहास 34 वाचा
ऐका २ इतिहास 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 34:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ