ह्यावरून हिज्कीया राजा आणि संदेष्टा यशया बिन आमोज ह्या दोघांनी प्रार्थना केली आणि स्वर्गाकडे पाहून धावा केला. मग परमेश्वराने एक दूत पाठवला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूर वीर, प्रमुख व नायक ह्यांची कत्तल केली; तेव्हा तो फजीत होऊन आपल्या देशास परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकले. ह्या प्रकारे परमेश्वराने हिज्कीयाला व यरुशलेमकरांना अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याच्या हातातून व इतर सर्वांच्या हातातून वाचवले, आणि तो त्यांना सर्व बाजूंनी मार्गदर्शक झाला. पुष्कळ लोकांनी परमेश्वराप्रीत्यर्थ यरुशलेमेस भेटी आणल्या आणि यहूदाचा राजा हिज्कीया ह्याला मौल्यवान वस्तू नजर केल्या; ह्यामुळे तो सर्व राष्ट्रांच्या दृष्टीने थोर झाला.
२ इतिहास 32 वाचा
ऐका २ इतिहास 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 32:20-23
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ