ह्या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रकट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने येऊन यहूदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घेण्याच्या हेतूने त्याने त्यांच्यासमोर तळ दिला. सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले. तेव्हा त्याने आपले सरदार व योद्धे ह्यांची मसलत घेऊन नगराबाहेरील पाण्याचे झरे बंद केले व ह्या कामी त्यांनी त्याला साहाय्य केले. पुष्कळ लोक जमा होऊन त्यांनी सर्व झरे बंद केले व देशामधून वाहणारा ओहोळही झाकून टाकला; ते म्हणाले, “अश्शूरचा राजा आल्यास त्याला मुबलक पाणी का मिळू द्यावे?” कोट मोडून पडला होता तो हिज्कीयाने हिंमत धरून पुन्हा बांधून काढला व त्यावरील बुरूज उंच केले आणि त्याच्या बाहेरचा दुसरा कोट त्याने मजबूत केला, दावीदपुरातल्या मिल्लो नावाच्या बुरुजाची मजबुती केली आणि शस्त्रे व ढाली मुबलक बनवल्या. त्याने प्रजेवर सेनापती नेमून त्यांना नगराच्या वेशीच्या चौकात आपल्याकडे एकत्र केले व त्यांना धीर देण्यासाठी तो त्यांना म्हणाला, “दृढ व्हा, हिंमत धरा, अश्शूरचा राजा व त्याच्याबरोबरचा मोठा समुदाय पाहून घाबरू नका, कचरू नका; त्याच्यापेक्षा आमच्या पक्षाचा जो आहे तो मोठा आहे. मांसमय भुजांचा त्यांना आधार आहे, पण आम्हांला मदत करण्यास व आमच्या लढाया लढण्यास आमचा देव परमेश्वर आमच्याबरोबर आहे.” यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या ह्या बोलण्यावर सर्व प्रजेने भरवसा ठेवला.
२ इतिहास 32 वाचा
ऐका २ इतिहास 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 32:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ