YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 27:1-6

२ इतिहास 27:1-6 MARVBSI

योथाम राज्य करू लागला तेव्हा तो पंचवीस वर्षांचा होता; त्याने यरुशलेमेत सोळा वर्षे राज्य केले; त्याच्या आईचे नाव यरूशा असे होते; ती सादोकाची कन्या. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले; त्याचा बाप उज्जीया ह्याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला; मात्र परमेश्वराच्या मंदिरात त्याने प्रवेश केला नाही. प्रजाजन अधिकाधिक बिघडत चालले. त्याने परमेश्वराच्या मंदिराचा वरचा दरवाजा बांधला आणि ओफेलच्या कोटावर पुष्कळ बांधकाम केले. त्याने यहूदाच्या पहाडी देशात शहरे वसवली आणि वनात गढ्या व बुरूज बांधले. त्याने अम्मोनी लोकांच्या राजाशी लढून त्यांच्यावर वर्चस्व मिळवले त्या वर्षी अम्मोनी लोकांनी त्याला शंभर किक्कार चांदी, दहा हजार कोर गहू, दहा हजार कोर जव अशी खंडणी दिली. दुसर्‍या व तिसर्‍या वर्षीही अम्मोनी लोकांनी अशीच खंडणी दिली. योथाम आपला देव परमेश्वर ह्याला स्मरून आपली वर्तणूक ठेवी म्हणून तो समर्थ झाला.