ह्यानंतर मवाबी व अम्मोनी आणि त्यांच्या- बरोबर मऊन्यातले1 कित्येक लोक युद्ध करण्यास यहोशाफाटावर चालून आले. काही लोकांनी येऊन यहोशाफाटास खबर दिली की, “समुद्रापलीकडून अराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे; तो जमाव हससोन-तामार उर्फ एन-गेदी येथवर आला आहे.” यहोशाफाटास धाक पडला व तो परमेश्वराला शरण जाण्याच्या मार्गास लागला; सर्व यहूदाने उपास करावा असे त्याने फर्मावले. यहूदी लोक परमेश्वराचे साहाय्य मागण्यासाठी एकत्र झाले; यहूदाच्या सर्व नगरांतून ते परमेश्वराचा धावा करण्यास आले. यहोशाफाट परमेश्वराच्या मंदिरात नव्या अंगणासमोर यहूदी व यरुशलेमकर ह्यांच्या जमावांमध्ये उभा राहिला. तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही. हे आमच्या देवा, तू ह्या देशाच्या रहिवाशांना आपल्या इस्राएल प्रजेपुढून घालवून देऊन हा देश तुझा मित्र अब्राहाम ह्याच्या वंशजांना कायमचा दिला आहेस ना?
२ इतिहास 20 वाचा
ऐका २ इतिहास 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: २ इतिहास 20:1-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ