YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 1:7-12

२ इतिहास 1:7-12 MARVBSI

त्या रात्री देवाने शलमोनाला दर्शन देऊन म्हटले की, “तुला काय वर हवा तो माग.” शलमोन देवाला म्हणाला, “माझा पिता दावीद ह्याच्यावर तुझी फार कृपा असे व तू मला त्याच्या जागी राजा केले आहेस. आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद ह्याला दिलेले वचन पूर्ण कर; मातीच्या रजःकणांप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केले आहेस. ह्या प्रजेसमोर वागण्यास मला आता चातुर्य व ज्ञान दे; तुझ्या एवढ्या मोठ्या प्रजेचे शासन कोणाला करता येईल?” देव शलमोनाला म्हणाला, “ज्या अर्थी असा तुझा मानस आहे म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य हे मागितले नाहीस, आपल्या वैर्‍यांचे प्राणहरण करण्याचे अथवा दीर्घायुषी होण्याचे मागितले नाहीस, तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमले आहे त्या माझ्या लोकांचे शासन करण्यासाठी चातुर्य व ज्ञान एवढेच तू स्वत:साठी मागितलेस, त्या अर्थी चातुर्य व ज्ञान हे तर तुला देतोच; ह्यांखेरीज आणखी तुझ्यापूर्वी कोणाही राजाला प्राप्त झाली नव्हती व तुझ्यानंतर कोणालाही कधी प्राप्त व्हायची नाही एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन.”