YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ इतिहास 1:2-6

२ इतिहास 1:2-6 MARVBSI

शलमोनाने सर्व इस्राएलाला म्हणजे सहस्रपती, शतपती, न्यायाधीश आणि सर्व इस्राएलाच्या पितृकुळांचे सर्व नायक ह्यांना सांगितल्यावरून शलमोनासह सर्व मंडळी गिबोन येथील उच्च स्थानी गेली; परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने रानात बनवलेला देवाचा दर्शनमंडप तेथेच होता. दाविदाने देवाच्या कोशासाठी जे स्थळ तयार केले होते तेथे किर्याथ-यारीमाहून तो आणला होता; त्याने यरुशलेमेत त्यासाठी डेरा उभारला होता. बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला. दर्शनमंडपाजवळ परमेश्वरासमोर जी पितळेची वेदी होती तिच्याजवळ शलमोनाने जाऊन तिच्यावर एक हजार होमबली अर्पण केले.