YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 तीमथ्य 4:6-16

1 तीमथ्य 4:6-16 MARVBSI

ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व ज्या सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. अनीतीच्या व आयाबायांच्या कहाण्यांपासून दूर राहा; आणि सुभक्तीविषयी कसरत कर; कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतींत उपयोगी आहे; सुभक्ती तर सर्व बाबतींत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. हे वचन विश्वसनीय व पूर्णपणे स्वीकारण्यास योग्य आहे. ह्याचसाठी आम्ही श्रम व खटपट करतो; कारण जो सर्व माणसांचा व विशेषेकरून विश्वास ठेवणार्‍यांचा तारणारा, त्या जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे. ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये; तर भाषण, वर्तन, प्रीती, (आत्मा), विश्वास व शुद्धता ह्यांविषयी विश्वास ठेवणार्‍यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण ह्यांकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडीलवर्ग2 हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नकोस. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्यांत गढून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वत:चे व तुझे ऐकणार्‍यांचेही तारण साधशील.