YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सल 4:13-18

1 थेस्सल 4:13-18 MARVBSI

बंधुजनहो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हांला सांगतो की, प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघांरूढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.

1 थेस्सल 4:13-18शी संबंधित विनामूल्य वाचन योजना आणि भक्ती