बंधुजनहो, शेवटी आम्ही तुम्हांला विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, तुम्ही कसे वागून देवाला संतोषवावे1 हे तुम्ही आमच्यापासून ऐकून घेतलेत व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात; त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी. कारण प्रभू येशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हांला दिल्या त्या तुम्हांला ठाऊक आहेत. कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणार्या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या देहावर2 ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे.3 कोणी ह्या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे, हे आम्ही तुम्हांला आगाऊ सांगितले होते व बजावलेही होते. कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे, तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.
1 थेस्सल 4 वाचा
ऐका 1 थेस्सल 4
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 थेस्सल 4:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ