दाविदाला बातमी लागली की पलिष्टी लोक कईला नगराशी लढत आहेत आणि धान्याची खळी लुटत आहेत. तेव्हा दाविदाने परमेश्वराला विचारले, “मी जाऊन त्या पलिष्ट्यांवर हल्ला करू काय?” परमेश्वर त्याला म्हणाला, “जा, पलिष्ट्यांवर मारा करून कईलाचा बचाव कर. दाविदाचे लोक त्याला म्हणाले, “पाहा, येथे यहूदात जर आम्हांला भीती आहे तर पलिष्ट्यांच्या सैन्यावर आम्ही कईलाकडे चालून गेलो तर मग काय विचारावे?” दाविदाने परमेश्वराला पुन्हा प्रश्न केला, तेव्हा परमेश्वराने त्याला सांगितले, “ऊठ, कंबर बांधून कईलास जा; मी पलिष्ट्यांना तुझ्या हाती देतो.” मग दावीद व त्याचे लोक कईलास गेले; त्यांनी पलिष्ट्यांशी युद्ध करून त्यांची गुरेढोरे हाकून आणली आणि त्यांची मोठी कत्तल केली. ह्या प्रकारे दाविदाने कईला येथील रहिवाशांचे रक्षण केले. अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता. दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.” तेव्हा कईलास जाऊन दाविदाला व त्याच्या लोकांना घेरावे म्हणून शौलाने आपल्या सर्व लोकांना युद्धासाठी बोलावले. शौल आपला नाश करण्याची मसलत करीत आहे हे दाविदाला समजले तेव्हा तो अब्याथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आण.” मग दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, शौल माझ्यामुळे कईला नगराचा नाश करण्यासाठी येऊ पाहत आहे, हे वर्तमान तुझ्या दासाने तरी नक्की ऐकले आहे. कईला येथील लोक मला शौलाच्या हाती देतील काय? तुझ्या दासाच्या कानावर आले आहे त्याप्रमाणे शौलाचे येणे होईल काय? हे परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तुझी मी विनवणी करीत आहे. तुझ्या दासाला काय ते सांग.” परमेश्वर म्हणाला, “तो येईल.” दाविदाने विचारले, “कईलाचे लोक मला व माझ्या लोकांना शौलाच्या हाती देतील काय?” परमेश्वर म्हणाला, “होय देतील.”
१ शमुवेल 23 वाचा
ऐका १ शमुवेल 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 23:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ