YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 21:1-6

१ शमुवेल 21:1-6 MARVBSI

दावीद नोब येथे अहीमलेख याजकाकडे आला; तेव्हा अहीमलेख थरथर कापत दाविदाला सामोरा येऊन म्हणाला, “तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही?” दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे, आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवत आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे तिच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नकोस, मला अमुक ठिकाणी येऊन भेटा असे मी आपल्या चाकरांना सांगितले आहे. तर आता तुझ्याजवळ काय आहे? मला पाच भाकरी दे अथवा जे काही तुझ्याजवळ असेल ते दे.” याजक दाविदाला म्हणाला, “माझ्याजवळ साधारण भाकर नाही, तर पवित्र भाकर आहे; तुझ्याबरोबरचे तरुण पुरुष मात्र स्त्रियांपासून दूर राहिलेले असले पाहिजेत.” दाविदाने याजकाला म्हटले, “आम्ही वास्तविक आज तीन दिवस स्त्रियांपासून दूरच आहो; आमचा प्रवास पवित्र कार्यासाठी नाही, तरी मी निघालो तेव्हा तरुण पुरुषांची पात्रे पवित्र होती ती आज कितीतरी जास्त असली पाहिजेत?” तेव्हा याजकाने त्याला पवित्र भाकर दिली; कारण त्या दिवशी समर्पित ऊन भाकर परमेश्वरासमोर ठेवण्यासाठी जुनी भाकर तेथून काढलेली होती; तिच्याशिवाय तेथे दुसरी भाकर नव्हती.