YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 2:30-36

१ शमुवेल 2:30-36 MARVBSI

ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल. पाहा, मी तुझा बाहू व तुझ्या पितृकुळाचा बाहू उच्छेदीन व तुझ्या घरी कोणीही वृद्ध माणूस सापडायचा नाही, असे दिवस येत आहेत. देवाने इस्राएल लोकांचा कितीही उत्कर्ष केला तरी माझ्या घराची दुर्दशा तू आपल्या डोळ्यांनी पाहशील; तुझ्या घराण्यात कोणीही म्हातारपण पाहणार नाही. तुझे डोळे क्षीण होतील व तुझे मन शोकाकुल होईल; तरीपण तुझ्या कुळातील सर्वच पुरुषांचा उच्छेद करून त्यांना मी आपल्या वेदीपासून दूर करणार नाही; तुझ्या घरी उत्पन्न होतील तेवढे पुरुष भरज्वानीत मरतील. तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास ह्यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल, ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील; आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन; तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील; मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषिक्तासमोर निरंतर चालेल. तुझ्या घराण्यातला जो कोणी वाचून राहील तो चवलीपावलीसाठी व कोरभर भाकरीसाठी त्याच्याकडे जाऊन त्याला दंडवत घालील व म्हणेल की याजकपणाचे कोणतेतरी काम मला द्या म्हणजे मला घासभर अन्न मिळेल.”