तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल; मी तुझा वध करीन, व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज पलिष्टी सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन; तेव्हा इस्राएलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल; आणि ह्या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजयी होतो असे नाही; कारण हे युद्ध परमेश्वराचे आहे; तो तुम्हांला आमच्या हाती देईल.” मग तो पलिष्टी उठून दाविदाशी सामना करायला जवळ आला, तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला सैन्य होते त्या दिशेकडे त्वरेने धावला. दाविदाने आपल्या बटव्यात हात घालून त्यातून एक गोटा घेऊन गोफणीत घातला, आणि ती गरगर फिरवून पलिष्ट्याच्या कपाळावर असा मारला की तो त्याच्या कपाळात घुसला आणि तो जमिनीवर पालथा पडला. ह्या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दाविदाच्या हाती तलवार नव्हती. दाविदाने धावत जाऊन त्या पलिष्ट्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्याचे शिर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेले.
१ शमुवेल 17 वाचा
ऐका १ शमुवेल 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 17:45-51
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ