YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 17:41-45

१ शमुवेल 17:41-45 MARVBSI

तिकडे तो पलिष्टीही दाविदाच्या जवळ आला; त्याचा शस्त्रवाहक त्याच्यापुढे चालत होता. त्या पलिष्ट्यांनी दाविदाला न्याहाळून पाहिले तेव्हा तो त्याला तुच्छ वाटला, कारण तो केवळ अल्पवयी असून तांबूस रंगाचा व सुकुमार होता. तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले. तो दाविदाला म्हणाला, “असा जवळ ये म्हणजे तुझे मांस आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देतो.” तेव्हा दावीद त्या पलिष्ट्याला म्हणाला, “तू तलवार, भाला व बरची घेऊन माझ्यावर चालून आलास; पण इस्राएली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस; त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे.