YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ शमुवेल 17:34-37

१ शमुवेल 17:34-37 MARVBSI

दावीद शौलास म्हणाला, “आपला दास आपल्या बापाची शेरडेमेंढरे राखत असता एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन कळपातील एक कोकरू घेऊन गेले, तेव्हा मी त्याच्या पाठीस लागून त्याला मारले आणि कोकराला त्याच्या जबड्यातून सोडवले; माझ्यावर त्याने झडप घातली, तेव्हा मी त्याची आयाळ धरून त्याला हाणून ठार केले. आपल्या दासाने त्या सिंहाला व अस्वलाला मारून टाकले. हा असुंती पलिष्टी त्या दोहोंपैकी एकासारखा ठरेल, कारण त्याने जिवंत देवाच्या सेनेला तुच्छ लेखले आहे.” दावीद आणखी म्हणाला, “ज्या परमेश्वराने मला सिंहाच्या व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या पलिष्ट्याच्या हातून सोडवील.” तेव्हा शौल दाविदाला म्हणाला, “जा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”