YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 3:1-5

1 पेत्र 3:1-5 MARVBSI

तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनावाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा उंची पोशाख करणे अशी बाहेरून दिसणारी नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी. कारण ह्याप्रमाणे पूर्वी, देवावर आशा ठेवणार्‍या पवित्र स्त्रियांही आपापल्या पतीच्या अधीन राहून आपणांस शोभवत असत