YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 3:12-17

1 पेत्र 3:12-17 MARVBSI

कारण ‘परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणार्‍यावर परमेश्वराची करडी नजर आहे.’ तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्त्वामुळे तुम्हांला दु:ख जरी सोसावे लागले, तरी तुम्ही धन्य. ‘त्यांच्या भयाने भिऊ नका व घाबरू नका’, तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्‍या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या; ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की, तुमच्याविरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणार्‍यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दु:ख सोसावे अशी देवाची इच्छा असली, तर वाईट करून दु:ख सोसण्यापेक्षा ते बरे आहे.