YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 पेत्र 2:11-17

1 पेत्र 2:11-17 MARVBSI

प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा. प्रभूकरता तुम्ही, माणसांनी स्थापलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणार्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणार्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठवलेले आहेत, म्हणून त्यांच्याही अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला कुंठित करावे. दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा. सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.