म्हणून सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व ‘प्रभू कृपाळू आहे ह्याचा तुम्ही अनुभव घेतला आहे,’ तर (तारणासाठी) तुमची आध्यात्मिक वृद्धी व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे वचनरूपी निर्या दुधाची इच्छा धरा. माणसांनी नाकारलेला तरी देवाच्या दृष्टीने ‘निवडलेला व मूल्यवान’ असा जो जिवंत ‘धोंडा’ त्याच्याजवळ येत असता, तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे. कारण असा शास्त्रलेख आहे : “पाहा, निवडलेली, मूल्यवान अशी कोनशिला मी सीयोनेत बसवतो; तिच्यावर विश्वास ठेवणारा फजीत होणार नाही.” म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना, “बांधणार्यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला,” आणि “ठेच लागण्याचा धोंडा व अडखळण्याचा खडक असा झाला;” ते वचन मानत नसल्यामुळे ठेचाळतात, त्यासाठी ते नेमलेही होते. पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत.’ ते तुम्ही पूर्वी ‘लोक नव्हता,’ आता तर ‘देवाचे लोक आहात; तुम्हांला दया मिळाली नव्हती,’ आता तर ‘दया मिळाली आहे.’ प्रियजनहो, जे तुम्ही ‘प्रवासी व परदेशवासी’ आहात त्या तुम्हांला मी विनंती करतो की, जिवात्म्याबरोबर लढणार्या दैहिक वासनांपासून दूर राहा. परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हांला दुष्कर्मी समजून तुमच्याविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून ‘समाचाराच्या दिवशी’ देवाचा गौरव करावा.
1 पेत्र 2 वाचा
ऐका 1 पेत्र 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 पेत्र 2:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ