ह्या देशावर दुष्काळ, मरी, शेते करपवून टाकणारा वारा अथवा भेरड, टोळ अथवा नाकतोडे हे आले, अथवा शत्रूंनी त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, कोणतीही आपत्ती अथवा रोग त्यांच्यावर आला, आणि इस्राएलातील एखादा माणूस किंवा तुझे सगळे इस्राएल लोक आपल्या जिवाला होणारा क्लेश ओळखून जी प्रार्थना किंवा विनवणी ह्या मंदिराकडे आपले हात पसरून करतील, ती तू स्वर्गातील आपल्या निवासस्थानातून ऐक, त्यांना क्षमा कर, त्याप्रमाणे घडवून आण, प्रत्येकाचे मन ओळखून त्याच्या सर्व वर्तनानुसार त्याला फळ दे; कारण सर्व मानवजातीची मने ओळखणारा केवळ तूच आहेस; म्हणजे जो देश तू आमच्या पूर्वजांना दिला त्यात ते राहतील तितके दिवस ते तुझे भय बाळगतील. तुझ्या इस्राएल लोकांतला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला, (कारण तुझे मोठे नाम, बलिष्ठ हात व पुढे केलेला बाहू हे सर्व त्यांच्या ऐकण्यात येणारच,) आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक व हा परदेशीय ज्या कशासाठी तुझा धावा करील त्याप्रमाणे कर; म्हणजे ह्या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील आणि मी जे हे मंदिर बांधले आहे त्यावर तुझे नाम आहे हे त्यांना कळून येईल.
१ राजे 8 वाचा
ऐका १ राजे 8
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 8:37-43
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ