त्या दिवसांत दोन वेश्या राजाकडे येऊन त्याच्यासमोर उभ्या राहिल्या. त्यांतली एक स्त्री म्हणाली, “माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो. हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले. मी प्रसूत झाल्यावर तिसर्या दिवशी ही स्त्रीदेखील प्रसूत झाली. आम्ही दोघी एकत्र होतो; आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते. रात्री ह्या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले; तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले. सकाळी मी बाळाला दूध पाजण्यासाठी उठून पाहते तर मूल मेलेले आढळले. सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले.” दुसरी स्त्री म्हणाली, “छे, नाही; जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे.” पहिली म्हणाली, “छे, नाही; मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.” असे त्या राजापुढे त्या बोलल्या. राजा म्हणाला, “एक म्हणते, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे; दुसरी म्हणते, छे, नाही; मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा.” मग राजा म्हणाला, “मला तलवार आणून द्या.” तेव्हा राजाला तलवार आणून दिली. राजा म्हणाला, “ह्या जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या.” तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजाला म्हणाली, “माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्याला मारून टाकू नका.” दुसरी स्त्री म्हणाली, “तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा.” मग राजाने म्हटले, “हा जिवंत मुलगा पहिलीला द्या, त्याला मारू नका, कारण तीच त्याची आई.” राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.
१ राजे 3 वाचा
ऐका १ राजे 3
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 3:16-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ