YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:8-14

१ राजे 18:8-14 MARVBSI

तो म्हणाला, “होय, तोच मी; जा, आपल्या धन्याला सांग की, एलीया आला आहे.” तो म्हणाला, “मला आपल्या दासाला मारून टाकण्यासाठी अहाबाच्या हाती आपण देऊ पाहता असा मी काय अपराध केला आहे? आपला देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठवले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही; तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलीया त्यांना आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यायला लावी. आणि आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे तू जाऊन आपल्या धन्याला सांग. मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे. ईजबेलीने परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध केला तेव्हा मी परमेश्वराचे शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवून ठेवले व त्यांना अन्नपाणी पुरवले, हे वर्तमान माझ्या स्वामींच्या कानी आले नाही काय? आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे जाऊन आपल्या धन्यास सांग; पण तो माझा वध करील.”