YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:17-24

१ राजे 17:17-24 MARVBSI

त्यानंतर घरधनिणीचा मुलगा आजारी पडला, त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. तेव्हा ती एलीयाला म्हणाली, “हे देवाच्या माणसा, तुमचा माझा काय संबंध? माझ्या पातकांचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलाला मारून टाकावे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला आहात का?” तो तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला घेऊन ये.” त्याने त्याला तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछान्यावर निजवले. मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले, “हे परमेश्वरा, माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे तिचा पुत्र मारून तू तिच्यावर अरिष्ट आणलेस काय?” मग त्याने तीन वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, “परमेश्वरा, हे माझ्या देवा, ह्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊ दे.” परमेश्वराने एलीयाचा शब्द ऐकला आणि त्या बालकाचा प्राण त्याच्या ठायी पूर्ववत येऊन तो पुनरपि जिवंत झाला. एलीया ते बालक घेऊन माडीवरून खाली आला आणि त्याला त्याच्या आईच्या हवाली करून म्हणाला, “पाहा, तुझा मुलगा जिवंत आहे.” ती स्त्री एलीयाला म्हणाली, “आपण देवाचे माणूस आहात आणि परमेश्वराचे सत्य वचन आपल्या तोंडून निघते हे मला आता कळून आले.”