YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 17:1-7

१ राजे 17:1-7 MARVBSI

एलीया तिश्बी हा गिलाद येथे उपरा म्हणून राहणार्‍यांपैकी एक होता; तो अहाबास म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ वाहून सांगतो की, जी वर्षे आता येणार त्यात दहिवर अथवा पाऊस पडणार नाही; हे सर्व माझ्या सांगण्याप्रमाणे होईल.” परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “येथून निघून पूर्व दिशेस जा, व यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक लपून राहा. त्या ओहळाचे पाणी तुला प्यायला मिळेल आणि मी कावळ्यांना आज्ञा केली आहे, ते तुला अन्न पुरवतील.” परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे करून तो यार्देनेसमोरच्या करीथ ओहळानजीक जाऊन राहिला. कावळे त्याला भाकरी व मांस सकाळसंध्याकाळ आणून देत, व त्या ओहळाचे पाणी तो पिई. काही दिवसांनी ओहळ आटून गेला, कारण त्या देशात पर्जन्यवृष्टी झाली नाही.