यराबाम आपल्या मनात म्हणाला की, “हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरुशलेमेत यज्ञ करायला गेले तर त्यांचा स्वामी यहूदाचा राजा रहबाम ह्याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जिवे मारून यहूदाचा राजा रहबाम ह्याचे पुन्हा होतील.” राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन दोन सोन्याची वासरे केली आणि लोकांना म्हटले, “आजवर तुमचे यरुशलेमेस जाणे झाले तेवढे पुरे; हे इस्राएला, ज्या देवांनी तुला मिसर देशातून आणले तेच हे पाहा.” त्याने एका वासराची बेथेल येथे व दुसर्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापाला कारण झाली; दानापर्यंतचे लोक ह्यांपैकी एका वासराच्या दर्शनाला जाऊ लागले. त्याने उच्च स्थानी मंदिरे बांधली, आणि सर्व लोकांतून याजक नेमले; ते लेवीचे वंशज नव्हते. मग यराबामाने आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी यहूदातील सणासारखा एक सण केला आणि वेदीवर होमबली अर्पण केले; त्याप्रमाणे त्याने बेथेल येथे आपण केलेल्या वासरांप्रीत्यर्थ यज्ञ केले, आणि आपण केलेल्या उच्च स्थानांच्या याजकांना बेथेल येथे ठेवले. जी वेदी त्याने बेथेलात बांधली होती तिच्यावर स्वतःच्याच मनाने ठरवलेल्या आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने होमबली अर्पण केले; त्याने इस्राएल लोकांसाठी हा सण स्थापला आणि वेदीवर यज्ञबली हवन करून अर्पण केला.
१ राजे 12 वाचा
ऐका १ राजे 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 12:26-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ