YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 7:32-35

१ करिंथ 7:32-35 MARVBSI

तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करतो; परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांला फासात गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो.