तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्याला दुसर्या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.
१ करिंथ 7 वाचा
ऐका १ करिंथ 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 7:1-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ