YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 5:1-9

१ करिंथ 5:1-9 MARVBSI

मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे. तरीही तुम्ही फुगला आहात! आणि हे कर्म करणारा आपणांतून घालवून देण्याइतका शोक तुम्ही केला नाही. मी शरीराने गैरहजर असलो तरी आत्म्याने हजर आहे आणि हजर असल्यासारखा मी तर निर्णय करून चुकलो आहे. तो असा की, ज्याने अशा प्रकारे हे कर्म केले त्या माणसाला तुम्ही व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने युक्त असा माझा आत्मा ह्यांनी एकत्र मिळून आपला प्रभू येशू ह्याच्या नावाने देहस्वभावाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे, अशा हेतूने की, आत्मा प्रभू येशूच्या दिवशी तारलाजावा. तुमचे हे आढ्यता बाळगणे बरे नव्हे. थोडे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हांला ठाऊक नाही काय? तर जुने खमीर काढून टाका, अशा हेतूने की, तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे, कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे आपल्यासाठी अर्पण झाले. म्हणून आपण सण पाळावा तो जुन्या खमिराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमिराने नव्हे, तर सात्त्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरींनी तो पाळावा. तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये, असे मी आपल्या पत्रात तुम्हांला लिहिले होते