YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 3:5-11

१ करिंथ 3:5-11 MARVBSI

अपुल्लोस कोण? आणि पौल कोण? ज्यांच्या द्वारे तुम्ही विश्वास ठेवला असे ते सेवक आहेत; ज्याला-त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे ते आहेत. मी लावले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देव वाढवत गेला. म्हणून लावणारा काही नाही आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढवणारा देव हाच काय तो आहे. लावणारा व पाणी घालणारा हे एकच आहेत, तरी प्रत्येकाला आपापल्या श्रमाप्रमाणे आपापली मजुरी मिळेल. कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.