तरी जर कोणी वितंडवादी दिसला तर आपल्यात अशी रीत नाही आणि देवाच्या मंडळ्यांतही नाही. आता असा आदेश देत असताना मी तुमची वाहवा करत नाही, कारण तुमच्या एकत्र होण्याने तुमचे बरे न होता वाईट होते. कारण प्रथम हे की, तुम्ही मंडळी ह्या नात्याने एकत्र जमता तेव्हा तुमच्यात फुटी असतात असे मी ऐकतो, व ते काही अंशी खरे मानतो; कारण तुमच्यामध्ये जे पसंतीस1 उतरलेले आहेत ते प्रकट व्हावेत म्हणून तुमच्यामध्ये पक्षभेद असलेच पाहिजेत. ह्यामुळे जेव्हा तुम्ही एकत्र जमता तेव्हा प्रभुभोजन करणे शक्य नसते. कारण भोजन करतेवेळी प्रत्येक जण आपल्या घरचे जेवण दुसर्यापूर्वी जेवतो; एक भुकेला राहतो तर एक मस्त होतो. खाणेपिणे करण्यास तुम्हांला आपापली घरे नाहीत की काय? किंवा तुम्ही देवाच्या मंडळीस धिक्कारून ज्यांच्याजवळ काही नाही त्यांना लाजवता काय? मी तुम्हांला काय म्हणू? ह्याविषयी मी तुमची वाहवा करू काय? मी तुमची वाहवा करत नाही. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे की, ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली; आणि आभार मानून ती मोडली, आणि म्हटले, “[घ्या, खा,]हे माझे शरीर तुमच्यासाठी [मोडलेले असे] आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा.” मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणिम्हटले,“हाप्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे; जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा.” कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचाप्यालापिईलतोप्रभूचेशरीरवरक्तह्यासंबंधानेदोषीठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण प्रभूच्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढवून घेतो.2 तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, आणि बरेच निद्रेत आहेत, ह्याचे कारण हेच. आपण आपला न्यायनिवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की, जगाच्याबरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. म्हणून माझ्या बंधूनो, तुम्ही भोजनास एकत्र जमता तेव्हा एकमेकांची वाट पाहा. कोणी भुकेला असला तर त्याने घरी खावे, अशा हेतूने की, तुमचे एकत्र जमणे दंडास कारण होऊ नये. बाकीच्या गोष्टींची व्यवस्था मी आल्यावर लावून देईन.
१ करिंथ 11 वाचा
ऐका १ करिंथ 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 11:16-34
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ