म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही मूर्तिपूजेपासून दूर पळा. तुम्हांला सुज्ञ समजून मी तुमच्याबरोबर बोलतो; मी काय म्हणतो त्याचा तुम्हीच निर्णय करा. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. जे जात्याच इस्राएल त्यांच्याकडे पाहा; यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? मूर्तीला दाखवलेला नैवेद्य काहीतरी आहे, अथवा मूर्ती काहीतरी आहे, असे माझे म्हणणे आहे काय? नाही; तर असे आहे की, परराष्ट्रीय जे यज्ञ करतात ‘ते देवाला नव्हे तर भुतांना करतात’; आणि तुम्ही भुतांचे सहभागी व्हावे अशी माझी इच्छा नाही. तुमच्याने प्रभूचा प्याला व भुतांचाही प्याला पिववत नाही; ‘प्रभूच्या मेजावरचे’ व भुतांच्याही मेजावरचे तुमच्याने खाववत नाही. आपण ‘प्रभूला ईर्ष्येस पेटवतो काय?’ आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही. कोणीही आपलेच हित पाहू नये तर दुसर्याचेही पाहावे. बाजारात खाटीक जे काही विकतात ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा; कारण “पृथ्वी व तिच्यावर जे काही भरले आहे ते परमेश्वराचे आहे.” विश्वास न ठेवणार्यांपैकी कोणी तुम्हांला जेवायला बोलावले, आणि तुमची जाण्याची इच्छा असली तर जे काही तुमच्यापुढे वाढतील ते सदसद्विवेकबुद्धीने चौकशी न करता खा; परंतु कोणी तुम्हांला सांगितले की, “हा मूर्तीचा नैवेद्य आहे,” तर ज्याने हे सुचवले त्याच्याखातर व सदसद्विवेक-बुद्धीखातर खाऊ नका. [कारण पृथ्वी व तिच्यावरील परिपूर्णता प्रभूची आहे.] येथे मी जिला सदसद्विवेकबुद्धी म्हणतो ती तुझी नव्हे तर त्याची; कारण माझ्या मुक्ततेचा निर्णय दुसर्याच्या सदसद्विवेकबुद्धीने का व्हावा? मी आभारपूर्वक खात असेन तर ज्याविषयी मी आभार मानतो त्याविषयी माझी निंदा का व्हावी? म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहूदी, हेल्लेणी व देवाची मंडळी ह्यांच्यापैकी कोणालाही अडखळवणारे होऊ नका; तर जसे मी सर्व गोष्टींत सर्वांना संतोषवतो आणि त्यांचे तारण व्हावे म्हणून स्वतःचे हित न पाहता पुष्कळ जणांचे हित पाहतो, तसे तुम्हीही करा.
१ करिंथ 10 वाचा
ऐका १ करिंथ 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 10:14-33
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ