‘ज्ञानी कोठे राहिला? शास्त्री कोठे राहिला?’ ह्या युगाचा वाद घालणारा ‘कोठे राहिला?’ देवाने जगाचे ‘ज्ञान मूर्खपणाचे ठरवले’ की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही,1 तेव्हा गाजवलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणार्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. कारण यहूदी चिन्हे मागतात व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो; हा यहूद्यांना अडखळण व हेल्लेण्यांना मूर्खपणा असा आहे खरा, परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांनाही ख्रिस्त हा देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान आहे. कारण देवाचा मूर्खपणा माणसांच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे; आणि देवाची दुर्बळता माणसांच्या बळाहून श्रेष्ठ आहे.
१ करिंथ 1 वाचा
ऐका १ करिंथ 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 1:20-25
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ