YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 6:31-48

१ इतिहास 6:31-48 MARVBSI

कोश स्थायिक झाल्यावर दाविदाने परमेश्वराच्या मंदिरात जे गायकगण नेमले होते ते हे : यरुशलेमेत शलमोन परमेश्वराचे मंदिर बांधीपर्यंत ते दर्शनमंडपाच्या निवासमंडपासमोर गायनपूर्वक सेवा करीत व ते आपल्या कामावर क्रमानुसार हजर राहत. तेथे हजर असत ते व त्यांचे पुत्र हे : कहाथी वंशापैकी गायक हेमान, बिन योएल, बिन शमुवेल, बिन एलकाना, बिन यरोहाम, बिन अलीएल, बिन तोहा, बिन सूफा, बिन एलकाना, बिन महथ, बिन अमासय, बिन एलकाना, बिन योएल, बिन अजर्‍या, बिन सफन्या, बिन तहथ, बिन अस्सीर, बिन एब्यासाफ, बिन कोरह, बिन इसहार, बिन कहाथ, बिन लेवी, बिन इस्राएल; आणि त्याचा भाऊ आसाफ त्याच्या उजवीकडे उभा असे, म्हणजे आसाफ बिन बरेख्या बिन शिमा, बिन मीखाएल, बिन बासेया, बिन मल्कीया, बिन एथनी, बिन जेरह, बिन अदाया, बिन एथान, बिन जिम्मा, बिन शिमी, बिन यहथा, बिन गेर्षोम, बिन लेवी; त्यांचे भाऊ मरारीचे वंशज डावीकडे उभे असत. ते एथान बिन किशी, बिन अब्दी, बिन मल्लूख, बिन हशब्या, बिन अमस्या, बिन हिल्कीया, बिन अमसी, बिन बानी, बिन शेमे, बिन महली, बिन मूशी, बिन मरारी, बिन लेवी. त्यांचे भाऊबंद जे लेवी ते देवाच्या मंदिराच्या निवासमंडपाच्या सर्व सेवेसाठी वाहिलेले होते.