YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 5:18-26

१ इतिहास 5:18-26 MARVBSI

रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक त्यांच्यातले बलवान पुरुष ढालाईत, धारकरी, धनुर्धारी व युद्धकलानिपुण असे चव्वेचाळीस हजार सातशे साठ लढाईस जाण्याजोगे लोक होते. त्यांनी हगरी यतूर, नाफीश व नोदाब ह्यांच्याशी युद्ध केले. त्यांच्याशी लढण्यास त्यांना कुमक मिळून त्यांनी हगरी व त्यांच्याबरोबरचे इतर लोक ह्यांना पादाक्रांत केले, कारण युद्धसमयी त्यांनी देवाचा धावा केला; त्यांनी त्याच्यावर भरवसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांनी त्यांची गुरेढोरे हरण केली; पन्नास हजार उंट, दोन लक्ष पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे एवढी जनावरे व एक लक्ष माणसे त्यांनी नेली. बहुत लोकांचा संहार झाला, कारण युद्ध देवाच्या पक्षाचे होते. त्यांचा स्वतःचा पाडाव होईपर्यंत ते त्यांच्या ठिकाणी वस्ती करून राहिले. मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी त्या देशात वस्ती केली; बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर, व हर्मोन पर्वत येथपर्यंत त्यांचा विस्तार झाला. त्यांच्या पितृकुळांपैकी प्रमुख पुरुष होते ते हे : एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या व यहदीएल; हे महावीर व नामांकित पुरुष असून आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते. त्यांनी आपल्या पूर्वजांच्या देवाशी फितुरी केली, आणि देवाने त्यांच्यापुढून ज्या लोकांचा नाश केला होता त्यांच्या देवांच्या नादी लागून ते अत्याचारी बनले. ह्यास्तव इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल आणि त्याच देशाचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्यांना उठवले; त्याने रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशाचे लोक ह्यांना पाडाव करून हलह, हाबोर, हारा येथे व गोजान नदीपर्यंत त्यांना नेऊन ठेवले व तेथेच ते आजवर वस्ती करून राहिले आहेत.