शिमोनाचे पुत्र : नमुवेल, यामीन, यारीब, जेरह व शौल;
त्याचा पुत्र शल्लूम; त्याचा पुत्र मिबसाम; त्याचा पुत्र मिश्मा.
मिश्माची संतती : त्याचा पुत्र हम्मूएल, त्याचा पुत्र जक्कूर, त्याचा पुत्र शिमी.
शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावांना फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.
ते वस्ती करून राहिले ती गावे ही : बैर-शेबा, मोलादा व हसर-शुवाल,
बिल्हा, असेम, तोलाद,
बथुवेल, हर्मा, सिकलाग,
बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दाविदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची नगरे होती.
त्यांची नावे एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान अशी पाच नगरे;
आणि बालापर्यंतची त्याच नगरांच्या आसपासची खेडीपाडी; त्यांची वसतिस्थाने व वंशावळ्या ह्या होत.
मेशोबाब, यम्लेक व योशा बिन अमस्या;
योएल, येहू बिन योशिब्या बिन सराया बिन असिएल;
एल्योवेनाय, याकोबा, यशोहाया, असाया, अदिएल, यशीमिएल व बनाया;
जीजा बिन शिफी बिन अल्लोन बिन यदाया बिन शिम्री बिन शमाया;
ज्यांची नावे येथे दाखल केली आहेत ते सर्व आपापल्या कुळांचे प्रमुख होते; त्यांच्या घराण्यांची झपाट्याने वाढ झाली.
ते आपल्या शेरडामेंढरांसाठी चारा शोधायला गदोर घाटात खोर्याच्या पूर्वेपर्यंत गेले.
तेथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला, आणि तो देश विस्तीर्ण असून शांत व निर्भय होता; तेथे पूर्वीपासून हामाचे वंशज राहत असत.
ज्यांची नावे वर दाखल केली आहेत त्यांनी यहूदाचा राजा हिज्कीया ह्याच्या कारकिर्दीत तेथे येऊन तेथील मूनी नावाच्या लोकांचा त्यांच्या डेर्यांसहित अगदी संहार करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.
त्यांच्यापैकी म्हणजे शिमोनाच्या वंशजांतल्या पाचशे पुरुषांनी ईशीचे पुत्र पलट्या, निरय्या, रफाया व उज्जीएल ह्यांना आपले नायक केले आणि ते सेईर पहाडावर गेले.
तेथे जे अमालेकी उरले होते त्यांचा संहार करून तेथे ते आजवर वस्ती करून आहेत.