ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले. पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा याइराचा पुत्र एलहानान ह्याने गथकर गल्याथ ह्याचा भाऊ लहमी ह्याचा वध केला; गल्याथाच्या भावाची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती. गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हातास व पायास सहा-सहा अशी एकंदर चोवीस बोटे होती. त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. हे पुरुष गथ गावी रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या सेवकांच्या हाताने पडले.
१ इतिहास 20 वाचा
ऐका १ इतिहास 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 20:4-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ