करूबारूढ असलेल्या परमेश्वर देवाच्या नामाचा कोश आणावा म्हणून दावीद व सर्व इस्राएल यहूदातले बाला उर्फ किर्याथ-यारीम येथे गेले. त्यांनी देवाचा कोश, अबीनादाबाच्या घरातून काढून एका नव्या गाडीवर ठेवला; उज्जा व अह्यो गाडी हाकत होते. दावीद व सर्व इस्राएल लोक देवासमोर जिवेभावे गीत गात आणि वीणा, सारंगी, डफ, झांजा व कर्णे वाजवत चालले. ते कीदोनाच्या खळ्यानजीक आले तेव्हा बैलांनी ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश धरायला आपला हात पुढे केला. तेव्हा उज्जावर परमेश्वराचा कोप भडकला; त्याने आपला हात कोशाला लावला म्हणून देवाने त्याला ताडन केले व तो त्याच्यापुढे गतप्राण झाला. परमेश्वराने उज्जाला तडाका दिला म्हणून दावीद फार खिन्न झाला, त्याने त्या ठिकाणचे नाव पेरेस-उज्जा (उज्जा-हनन) ठेवले, ते आजवर चालत आहे. त्या दिवशी दाविदाला देवाचा धाक वाटून तो म्हणाला, “देवाचा कोश माझ्या घरी कसा आणावा?” दाविदाने तो कोश आपल्या येथे दावीदपुरात नेला नाही, तर ओबेद-अदोम गित्ती ह्याच्या घरी एकीकडे नेऊन ठेवला. देवाचा कोश ओबेद-अदोम ह्याच्या घरी तीन महिने राहिला; परमेश्वराने ओबेद-अदोमाचे घराणे व त्याचे सर्वस्व ह्यांना बरकत दिली.
१ इतिहास 13 वाचा
ऐका १ इतिहास 13
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 13:6-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ