YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 1:43-54

१ इतिहास 1:43-54 MARVBSI

इस्राएल लोकांवर कोणी राजाने राज्य करण्यापूर्वी अदोम देशावर ज्या राजांनी राज्य केले ते हे : बौराचा पुत्र बेला; त्याची राजधानी दीन्हाबा हे नगर होते. बेला मेल्यावर बस्रा येथला जेरहाचा पुत्र योबाब त्याच्या गादीवर बसला. योबाब मेल्यावर तेमानींच्या देशाचा हूशाम त्याच्या गादीवर बसला. हूशाम मेल्यावर त्याच्या जागी बदादाचा पुत्र हदाद त्याच्या गादीवर बसला; ह्यानेच मवाब मैदानात मिद्यानाचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते. हदाद मेल्यावर मास्रेका येथील साम्ला त्याच्या गादीवर बसला. साम्ला मेल्यावर फरात नदीतीरीच्या रहोबोथ नावाच्या नगरातला शौल त्याच्या गादीवर बसला. शौल मेल्यावर अकबोराचा पुत्र बालहानान त्याच्या गादीवर बसला. बालहानान मेल्यावर हदाद त्याच्या गादीवर बसला. त्याची राजधानी पाई होती; त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल, ती मे-जाहाबाची कन्या जी मात्रेद तिची कन्या होती. हदाद मेल्यावर अदोमाचे सरदार झाले ते हे : सरदार तिम्ना, सरदार आल्या, सरदार यतेथ, सरदार अहलीबामा, सरदार एला, सरदार पिनोन, सरदार कनाज, सरदार तेमान, सरदार मिब्सार, सरदार माग्दीएल व सरदार ईराम. हे अदोमाचे सरदार होत.