1
योहान 13:34-35
मराठी समकालीन आवृत्ती
“मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देत आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्वजण ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.”
तुलना करा
एक्सप्लोर करा योहान 13:34-35
2
योहान 13:14-15
आता ज्याअर्थी मी तुमचा प्रभू व गुरू असूनही तुमचे पाय धुतले, तसेच तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. जसे मी तुम्हासाठी केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला नमुना घालून दिला आहे.
एक्सप्लोर करा योहान 13:14-15
3
योहान 13:7
येशूंनी उत्तर दिले, “मी काय करीत आहे, हे तुला आता कळणार नाही, नंतर पुढे कधी तरी कळेल.”
एक्सप्लोर करा योहान 13:7
4
योहान 13:16
मी खरोखर तुम्हाला सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही, संदेशवाहक ज्याने त्याला पाठविले त्यापेक्षा मोठा नाही.
एक्सप्लोर करा योहान 13:16
5
योहान 13:17
आता तुम्हाला या गोष्टी समजल्या आहेत, तुम्ही त्याप्रमाणे कराल तर तुम्ही आशीर्वादीत व्हाल.
एक्सप्लोर करा योहान 13:17
6
योहान 13:4-5
म्हणून येशू भोजनावरुन उठले आणि आपली बाहेरील वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल कमरेस बांधला. त्यानंतर, त्यांनी मोठ्या घंगाळात पाणी ओतले आणि ते आपल्या शिष्यांचे पाय धुऊ लागले आणि आपल्या कमरेभोवती असलेल्या रुमालाने पुसू लागले.
एक्सप्लोर करा योहान 13:4-5
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ