यरुशलेमवरील शांतीसाठी प्रार्थना करा की
या नगरीवर प्रीती करणार्या सर्वांची सुरक्षा होवो.
तुझ्या तटांच्या आत शांती नांदो;
तुझ्या राजवाड्यामध्ये सुरक्षितता राहो.
जे माझे कुटुंब व माझे स्नेही येथे राहतात, त्यांच्यासाठी मी मागतो,
“तुझ्यामध्ये शांती नांदो.”