येशूंनी उत्तर दिले, “सर्वात महत्वाची आज्ञा ही आहे की ‘हे इस्राएला ऐक, प्रभू आपला परमेश्वर एकमेव परमेश्वर आहे. तुमचा प्रभू परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण अंतःकरणाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्ण शक्तीने प्रीती कर.’ दुसरी ही आहे: ‘जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करा.’ या आज्ञांपेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.”