“परंतु मी इस्राएलाच्या लोकांबरोबर करार करेन तो असा”
याहवेह जाहीर करतात, “त्या वेळेनंतर
मी माझा नियम त्यांच्या मनात ठेवेन,
आणि ते त्यांच्या हृदयावर लिहेन,
मी त्यांचा परमेश्वर होईन,
आणि ते माझे लोक होतील.
कोणीही आपल्या शेजाऱ्याला बोध करणार नाही,
किंवा ‘याहवेहला ओळखा’ असे कोणी कोणाला बोलणार नाही,
कारण लहानापासून ते थोरापर्यंत सर्वजण
मला ओळखतील,”
असे याहवेह जाहीर करतात.
“मी त्यांच्या दुष्कृत्यांची क्षमा करेन
व यापुढे त्यांची पापे स्मरणार नाही.”