1
यशायाह 9:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण आम्हासाठी एक बाळ जन्मले आहे, आमच्यासाठी एक पुत्र दिला आहे, आणि सत्ता त्यांच्या खांद्यावर असेल. आणि त्यांना अद्भुत सल्लागार, पराक्रमी परमेश्वर, सार्वकालिक पिता, शांतीचा राजकुमार असे म्हणतील.
तुलना करा
एक्सप्लोर करा यशायाह 9:6
2
यशायाह 9:2
अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे; गडद अंधकार असलेल्या देशात राहणाऱ्यांवर प्रकाश उदय पावला आहे.
एक्सप्लोर करा यशायाह 9:2
3
यशायाह 9:7
त्यांच्या सत्तेच्या महानतेचा आणि शांतीचा अंत होणार नाही. ते दावीदाच्या सिंहासनावरून राज्य करतील आणि त्याच्या राज्यावर राज्य करतील, ते त्या काळापासून आणि सर्वकाळपर्यंत न्याय आणि धार्मिकता स्थापन करतील आणि टिकवतील. सर्वसमर्थ याहवेहचा आवेश हे पूर्ण करेल.
एक्सप्लोर करा यशायाह 9:7
4
यशायाह 9:5
लढाईत वापरलेले प्रत्येक योद्ध्याची पायतणे आणि रक्ताने माखलेले प्रत्येक वस्त्र जळण्यासाठी पूर्वनियोजित केले जाईल, जाळण्यासाठी इंधन असे होईल.
एक्सप्लोर करा यशायाह 9:5
5
यशायाह 9:1
तरीसुद्धा, जे संकटात होते त्यांच्यासाठी यापुढे निस्तेज काळोखी नसेल. भूतकाळात त्यांनी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांतांना नमविले होते, परंतु भविष्यामध्ये ते समुद्राच्या मार्गाकडून जाणाऱ्या यार्देनेच्या पलीकडील गालील राष्ट्रांचा सन्मान करतील
एक्सप्लोर करा यशायाह 9:1
6
यशायाह 9:3
तुम्ही राष्ट्राचा विस्तार केला आहे आणि त्यांचा आनंद वाढविला आहे. जसे लोक कापणीच्या वेळेस आनंद करतात, तसे ते तुमच्यासमोर आनंद करतात, लुटलेला माल वाटून घेतांना युद्ध करणारे आनंद करतात तसे.
एक्सप्लोर करा यशायाह 9:3
7
यशायाह 9:4
कारण जसे मिद्यानाच्या पराभवाच्या दिवसामध्ये, तुम्ही त्यांच्यावर ओझे असलेले जोखड, त्यांच्या खांद्यांवरील लोखंडाची सळई, त्यांच्यावर जुलूम करणाऱ्याची काठी मोडून टाकली आहे.
एक्सप्लोर करा यशायाह 9:4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ