त्यांनी घरे बांधावी आणि इतरजण त्यात येऊन राहतील,
किंवा ते पेरतील आणि इतरजण खातील, असे आता कदापि होणार नाही,
कारण जितका जीवनकाल वृक्षाचा असेल,
तसेच माझे लोक दीर्घायुषी होतील;
माझे निवडलेले लोक त्यांच्या हाताने मिळविलेले प्रतिफळ
सुखाने बहुतकाळ उपभोगतील.